Raj Thackeray warns to demolish Namo Tourism Centre
esakal
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नमो टुरिझम सेंटरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. काल मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं होतं. यावेळी त्यांनी शिवरायांच्या गड किल्ल्यावर नमो सेंटर उभारल्यास ते तोडू असा इशाराही दिला होता. दरम्यान, राज ठाकरेंच्या याच टिकेला आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.