

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे, यानिमित्त चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात पक्षप्रमुख राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की काही गोष्टीपासून तुमचे लक्ष भरकटवण्यासाठी सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला असून आपापसात वाद लावण्याचे आणि सोशल मीडियावर टाळकी भडकवण्याचे जाणूनबूजून काम सुरु आहे. सदानंद मोरे यांची भाषणे राज्यभर आयोजित करणार असून आज जास्त काही बोलणार पण गुडी पाडव्याला दांडपट्टाच फिरवणार आहे. असे राज ठाकरे म्हणाले.