
मुंबई : हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर शासनाने मागे घेतला. ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे, असे आम्ही गृहीत धरत आहोत. महाराष्ट्रातील जनता पण हेच गृहीत धरीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिले जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. मात्र पाच तारखेचा मोर्चा रद्द करण्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.