लॉकडाऊन : राजेश टोपेंची मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी | Rajesh Tope Statement on Lockdown | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope Statement on Lockdown

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरूनही राजेश टोपे यांनी सर्वांना एक आवाहन केलं आहे.

लॉकडाऊन : राजेश टोपेंची मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी

देशात लसीकरणात आता नव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. एका बाजुला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे जालन्यात पोहोचले आहेत. त्यांनी एका लसीकरण केंद्रावर ते पोहोचले. जालन्याचे (jalna) पालकमंत्री असणाऱ्या राजेश टोपे यांनी लसीकरणाचा आढावा घेतला. यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की, मुलं उत्साहाने लसीकरणासाठी आली आहेत. त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लस देण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार ही प्रकिया राबवली जात असून स्वतंत्र व्यवस्थाही उभारली आहे.

कोरोना चाचणीचे किट उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्राकडे कऱण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी केंद्राकडे राज्य सरकारने केली असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

हेही वाचा: वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र

लॉकडाऊनसंदर्भात विचारले असता राजेश टोपे म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लागू केले जातायत. महाराष्ट्रात उपलब्ध ऑक्सिजन आणि रुग्णालयातील बेड्सची संख्या यावरून निर्बंध ठरवण्यात येतील. सध्या हरयाणात, दिल्लीत निर्बंध आहेत. प्रत्येक राज्य वेगळ्या पद्धतीने निर्बंध लागू करतायत. तर आयसीएमआर वगैरे संस्था आहेत त्यांना नियोजनाचे अनुभव असतात, त्यांनी सर्व राज्यांना समान निर्बंध लागू करण्याबाबत मार्गदर्शन करायला हवं अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. (Rajesh Tope Statement on Lockdown)

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात निर्बंध इतके सक्तीने केले आहेत तर सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. नेत्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावल्यावर किती गर्दी असते हे माहिती नसतं, आयोजक गर्दी करतात. नेत्यांनी आयोजकांना सूचना द्याव्यात. आयोजकांनी गर्दी होणार नाही काळजी घ्यावी. जनतेनेसुद्धा अशा गोष्टींचें भान ठेवावे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtra
loading image
go to top