30 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येकाला किमान एक डोस - टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

30 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात प्रत्येकाला किमान एक डोस - टोपे

sakal_logo
By
ओमकार वाबळे

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला किमान एक डोस मिळालेला असावा अशी भूमिका घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं सांगितलं.

देशात हर घर दस्तक आणि राज्यात कवच कुंडल या मोहिमांअंतर्गत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. या धोरणानुसार येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला किमान एक डोस मिळण्याची तयारी आम्ही केल्याची माहिती टोपेंनी दिली. त्यानुसार शहरं आणि ग्रामीण भागात योजना राबवत लसीकरणाबाबत जनजागृती पसरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या राज्यात 80 टक्क्यांहून जास्त लोकांचं लसीकरण झालं आहे.

शहरात वार्ड ऑफिसरांना लस न घेतलेल्या व्यक्तींचा डेटा काढायला सांगितला आहे. त्यानुसार आशा वर्कर्स घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करणात आहेत. तसेच ग्रामीण भागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ही जबाबदारी पार पाडणार आहे.

loading image
go to top