मुंबई - ‘भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रिसिंहराजे भोसले, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नीतेश राणे आदी आदी उपस्थित होते.