Raju Shetti : राज्यातील नेत्यांचा प्रकल्प घोटाळा पुराव्यासह बाहेर काढणार

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विकासकामांचे उद्‍घाटन करण्यापासून रोखणार-राजू शेट्टी
raju shetti
raju shettisakal media

कोल्हापूर : शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून राजू शेट्टी यांच्या संघटनेच्यावतीने महावितरण कार्यायलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शेट्टी (Raju Shetti) यांनी केलेल्या मागण्यांबाबत व केलेल्या आरोपावर सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. आज अखेर शासनाकडून चर्चेचे कोणतीच निमंत्रण आले नाही. सरकारकडून या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग आठवडाभरात फोडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

Summary

सरकारकडून या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

घोटाळे बाहेर काढणार

दरम्यान, ४ मार्चपर्यंत सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विकासकामांचे उद्‍घाटन करण्यापासून रोखण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांना लुटून झाल्यानंतर आता या पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांनी वीज प्रकल्पाच्या माध्यमातूनही पैसे लुटायला सुरुवात केली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याची रणनीतीही ठरवली आहे. वीज प्रकल्पात नेत्यांनी केलेले घोटोळे पुराव्यासह बाहेर काढण्याचा इशाराही दिला आहे.

raju shetti
विधानसभा निवडणुका संपत आल्याची चाहूल- वडेट्टीवारांचे सूचक वक्तव्य

राज्यभरातून पाठिंबा

या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नेत्यांबरोबच जिल्ह्यातील जवळपास दीडशेहून अधिक ग्रामपंचायती, विविध संस्था, सेवा सोसायटी यांच्यासह सामाजिक संस्थाकडून पाठिंबा मिळाला आहे.

भजन, किर्तनातून जाग...

सरकारला जाग यावी यासाठी आंदोलनस्थली सायंकाळी परिसरातील भजनी मंडळाकडून भजन, किर्तनाचा कार्यक्रम केला जातआहे. या आंदोलनाच्या ठीकाणी विविध संस्था,संघटनांनकडून जेवणाची व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com