काँग्रेसच्या नेत्यांनी 'हिंदू'चा अपमान करण्याची सुपारी घेतलीय का? खुर्शीद विरोधात राम कदम FIR दाखल करणार : Ram Kadam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ram kadam  salman khurshid

काँग्रेसच्या नेत्यांनी 'हिंदू'चा अपमान करण्याची सुपारी घेतलीय का?

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी (Sunrise Over Ayodhya) 'सनराइज ओव्हर आयोध्या' या पुस्तकात समस्त हिंदू धर्माची तुलना आतंकवादी संघटनेशी करून हिंदूचा अपमान केला आहे. या काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदूचा अपमान करण्याची सुपारी घेतलीय का? उद्या सकाळी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये खुर्शीदवर एफआयआर दाखल करायला जात आहोत. ठाकरे सरकारला आमचा एफआयआर(FIR) दाखल करून घ्यावाच लागेल असा इशारा बीजेपीचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी दिला आहे.

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. खुर्शीद यांचे बुधवारी पुस्तक प्रकाशित झाले. यामध्ये त्यांनी हिंदुत्ववादी संघटनेची तुलना थेट दहशतवादी संघटना (ISIS) आणि बोको हरम सोबत केली आहे. या पुस्तका विरोधात दिल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

काय म्हणाले पुस्तकात

या पुस्तकात हिंदुत्वाचे राजकारण करणारे चुकीचे लोक आहेत. आणि 'आयएसआय' ही वाईट आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हिंदुत्व सनातन साधु-संत आणि प्राचीन हिंदू धर्म बाजूला ठेवत आहे, जे प्रत्येक प्रकारे जिहादी इस्लामिक संघटना सारखं आहे. असे सलमान खुर्शीद म्हणाले. यावरून शिवसेनेनेही खुर्शिद यांना फटकारले आहे.

loading image
go to top