
"बार्टी संस्थेचा भोंगळ कारभार कुणाच्या आशीर्वादाने चाललाय?"
अमरावती (Amravati) च्या सावंगी मग्रापुर गावातल्या दलित बहूल वॉर्डात सरपंचांनी पाण्याचे कनेक्शन तोडले. यावर भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत हा सरळ सामाजिक बहिष्कार असल्याचे म्हटले आहे. आघाडीची सत्ता आली की दलित, शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात, असा घणाघातही राम सातपुते यांनी केलाय. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या संदर्भात दखल देत चौकशीचे आदेश दिले पाहीजे, असे ही ते म्हणाले.
“फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावानं मत मागून, इथल्या वंचित शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पुन्हा एकदा दलितांना पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागत आहे” अशी टिका राम सातपुतें यांनी केली.
हेही वाचा: नितेश राणेंचा आज फैसला! नारायण राणे दिल्लीतून कोकणात दाखल
“दलितांच्या विकासासाठी असणारी बार्टी संस्था (Babasaheb Ambedkar Research and Training Institute) ही लाभ देण्यासाठी सावकरासारखी वागत आहे. या बार्टीमध्ये बिले काढण्यासाठी पार्ट्या द्याव्या लागत आहे. या बार्टी संस्थेचा भोंगळ कारभार कुणाच्या आशीर्वादाने चाललाय?” असा प्रश्न सुध्दा राम सातपुतेंनी उपस्थित केलाय आणि मंत्री धनंजय मुंडेना याचे उत्तर द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
Web Title: Ram Satpute Criticize On Mahavikas Aaghadi Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..