मागील दोन्ही खासदारांपेक्षा जास्त मते घेऊनही राम सातपुते पराभूत! 2019च्या तुलनेत काँग्रेसला अडीच लाख मते जास्त; भाजप आमदारांच्याच बालेकिल्ल्यात लिड

दोन्ही खासदारांपेक्षा २१ ते २८ हजार मते जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला हे विशेष. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले सव्वालाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले.
sakal
Ram Satputesolapur loksabha

सोलापूर : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ॲड. शरद बनसोडे हे पाच लाख १७ हजार ८७९ मते घेऊन खासदार झाले. २०१९च्या निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पाच लाख २४ हजार ९८५ मते मिळवली व ते खासदार झाले. या दोन्ही खासदारांपेक्षा २१ ते २८ हजार मते जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला हे विशेष. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले सव्वालाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले.

मोदी लाटेत २०१४च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ २०१९च्या निवडणुकीतही याठिकाणी भाजपनेच बाजी मारली. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेससमोर थेट भाजपचे उमेदवार ॲड. शरद बनसोडे यांचे आव्हान होते. या निवडणुकीत काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयाची आशा होती, पण याही निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पराभव केला.

दहा वर्षे राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या मतदारसंघात कमबॅक करणे काँग्रेससाठी मुश्किल होते. २०१४ व २०१९ च्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे मतदान वाढले होते. २०१४च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ॲड. बनसोडे यांना पाच लाख १७ हजार ८७९ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना पाच लाख २५ हजार ९८५ मते मिळाली. तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ॲड. बनसोडे यांच्या तुलनेत २८ हजार १४९ तर डॉ. महास्वामी यांच्या तुलनेत २१ हजार ४३ मते जास्त मिळाली. तरीदेखील या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला हे विशेष.

तीन निवडणुकांमधील मतदानाची स्थिती

 • (२०१४)

 • एकूण मतदान

 • ९,५१,५१०

 • काँग्रेसला पडलेले मतदान

 • ३,६८,२०५

 • भाजपला पडलेले मतदान

 • ५,१७,८७९

-------------------------------------------------------------------

 • (२०१९)

 • एकूण मतदान

 • १०,८४,५१४

 • काँग्रेसला पडलेले मतदान

 • ३,६६,३७७

 • भाजपला पडलेले मतदान

 • ५,२४,९८५

-----------------------------------------------------------------

 • (२०२४)

 • एकूण मतदान

 • १२,०४,६११

 • काँग्रेसला पडलेले मतदान

 • ६,२०,२२५

 • भाजपला पडलेले मतदान

 • ५,४६,०२८

‘वंचित- एमआयएम’चा उमेदवार नसल्याचा लाभ

२०१४च्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार व ‘नोटा’सह अपक्ष उमेदवारांना ४० हजारांपर्यंत मते होती, पण यावेळी मोदी लाट असल्याने भाजपला येथे यश मिळाले. २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: मैदानात उतरले होते. त्यांना पावणेदोन लाखांपर्यंत मते मिळाल्याने काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला. पण, २०२४च्या निवडणुकीत अपक्षांसह ‘वंचित’ व एमआयएमचे तगडे आव्हान नसल्याने काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com