Jamkhed Bazar Samiti: रोहित पवारांना मोठा धक्का! 'त्या' चिठ्ठीने जामखेड बाजार समितीवर भाजपचा झेंडा

rohit pawar
rohit pawaresakal

राज्यात पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत जामखेड बाजार समितीत भाजपच्या एक हाती वर्चस्वाला रोहित पवार यांनी सुरूंग लावला या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीलाच्या गटाला समसमान जागा मिळाल्या. मात्र आता राम शिंदे यांनी रोहित पवार यांना धक्का देत बाजी मारली आहे.

rohit pawar
Pradeep Kurulkar: प्रदीप कुरूलकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार गटाला समसमान जागा मिळाल्या होत्या. दोन्ही गटांचे 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सभापती पदासाठी ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली आहे.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक फार चुरशीची झाली होती, भाजपच्या राम शिंदे यांनी कर्जत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी भाजपमध्ये प्रवेश देत भाजपच्या पॅनलकडून तिकीट दिले होते. राम शिंदे यांच्या या राजकीय खेळीमुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com