राम मंदिर भूमिपूजनावरुन राजकारण तापलं, पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर भाजपचं प्रत्त्युत्तर

राम मंदिर भूमिपूजनावरुन राजकारण तापलं, पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर भाजपचं प्रत्त्युत्तर

मुंबईः  राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  भाजपला टोला लगावला होता. आता शरद पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे  शरद पवार यांच्या NOC गरज लागणार नाही, असा खोचक टोला दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 

काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात शरद पवारांनी सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.  

शरद पवार यांनी मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पहले मंदिर फिर सरकार पण आधी ते सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि आता राम मंदिर होत आहे. 

राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, अजून उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या एनओसीची गरज लागणार नाही, ही अपेक्षा आहे, असं म्हणत  दरेकरांनी पवारांना टोला लगावला आहे.

तसंच शरद पवार यांची जी भूमिका आहे तशीच भूमिका ते सुद्धा घेतील अस मला वाटत नाही. हिंदुत्व आणि राम मंदिरच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे कशाची पर्वा करणार नाही आणि शरद पवार यांच्या एनओसीची वाट पाहणार नाही, असंही ते म्हणालेत. सरकार चालवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. पण त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यावे, असंही त्यांनी सांगितलं. 

शिवसेनापूर्वी आम्हाला म्हणत होती की, 'मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नही बताएगें' पण आता तर तारीख सांगितली आहे तेव्हा ते जातील अशी अपेक्षा आहे', असं म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंना आपल्या विधानाची आठवण करून दिली.

दरम्यान, संजय राऊत यांना पवारांची एनओसी लागते उद्धव ठाकरेंना लागेल असं वाटत नाही, असा टोलाही दरेकरांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Ram Temple Bhumi Pujan Pravin Darekar back answer sharad pawar uddhav thackeray not need any noc

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com