माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या पाठिशी- रामदास आठवले

Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal

शिवसैनिकांची दादागिरी खपवून घेणारी नाही. शिंदेंना काही झाल तर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या पाठिशी आहेच. असे वक्तव्य करत बंडखोर शिंदेंच्या भूमिकेला रामदास आठवले यांनी समर्थन(Ramdas Athavale supported the role of rebel Eknath Shinde maharashtra politics) दर्शवले आहे.

रामदास आठवले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यादरम्यान, दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती आठवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. चर्चेदरम्यान, एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद हा अंतर्गत आहे. त्यांच्या पक्षातील ही वैयक्तिक बाब असून भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. असे फडणवीस यांनी सांगितले असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale
MH Politics: एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं, थेट सेनेच्या अस्तित्वाला आव्हान!

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वतः आपापसातील वाद मिटवतील, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही वाट पाहत आहोत. असही फडणवीस म्हटले असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

विधानसभेचे आमदार हे शिंदेंसोबत आहे. हे सरकार अप्लमतामध्ये आहे. त्यामुळे हे सरकार कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. तसेच पक्षातून काढून टाकणे ठिक आहे पण आमदारकी रद्द करण्याची मागणी चुकीची आहे. गेगेले आमदार तुमच्याकडे परत येतील याची शक्यता कमी आहे.

तसेच, आम्ही सरकार स्थापनेचा विचार केलेला नाही. येणाऱ्या काळात काय होते ते पाहू. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बहुमत दाखवू, असे म्हणत अनेक आमदार तुम्हाला सोडून गेले- शिवसेनेचे ३७ आणि ७-८ अपक्ष- असे कसे म्हणता येईल? असा सवाल आठवले यांनी यावेळी केला आहे.

Ramdas Athawale
बंडखोर आमदारांसह कुटुंबियांनाही सुरक्षा देणार; वळसे पाटलांची घोषणा

यासोबतच, एकनाथ शिंदेच्या सुरक्षतता काढून टाकण्यासंदर्भात विचारलं असता, शिवसेनेत गुंडागर्दी सरु आहे. एकनाथ शिंदेंकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आहेला नाही. शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही. शिंदेंना काही झाल तर माझा संपूर्ण पक्ष शिंदेंसोबत असेल.

तुम्हाला वाटत असेल की गेगेले आमदार इकडे परतील तर ठीक आहे. पण हे बंडखोर आमदार पुन्हा परतणार नाही. तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर करु शकता. पण दादागिरी करण उपयोगाच नाही. या दादागिरीला आम्हीदेखील उत्तर देऊ. आणि एकनाथ शिंदेंवर अन्याय होत असेल तर माझा पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. असे सांगत त्यांनी शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com