थोडा संयम बाळगायला हवा, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांना सल्ला | Yashomat Thakur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adv. Yashomati Thakur
थोडा संयम बाळगायला हवा, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांना सल्ला

थोडा संयम बाळगायला हवा, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांना सल्ला

मुंबई : अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा, असा सल्ला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिला आहे. आज फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. अमरावती दंगलीप्रकरणी (Amravati Riot) राज्य सरकारकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यावर ठाकूर यांनी वरील सल्ला दिला आहे. ठाकूर आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, की आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे.

हेही वाचा: मायलेज देणारी Honda Livo खरेदी करा ९ हजारात, EMI इतका भरा

१२ तारखेची घटना चुकीची होतीच. त्यांच कोणीच समर्थन केलेले नाही. तसचं १३ तारखेची घटना चुकीची होती, अस स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलेले आहे. या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

loading image
go to top