Video : विरोधकांची अर्थसंकल्पावरील टीका ऐकून आठवलेंना सुचली कविता; म्हणाले…

ramdas athawale kavita Video slams opposition over Union Budget 2023 watch viral video
ramdas athawale kavita Video slams opposition over Union Budget 2023 watch viral video sakal media
Updated on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

या बजेटमध्ये सर्वांना लक्षात घेण्यात आल्याचे रामदास आठवले म्हणाले. त्यांनी या अर्थसंकल्पात आदिवासी, महिला, मध्यमवर्ग अशा सर्वांना न्याय देण्यात आला आहे असे म्हटले आहे. यामुळे विरोधक घाबरले आहेत आणि २०२४ च्या निवडणूकांना समोरे ठेवून सादर करम्यात आलं असल्याचे सांगत आहेत पण तसं काही नाही असेही आठवले म्हणालेत.

ramdas athawale kavita Video slams opposition over Union Budget 2023 watch viral video
अदानींनी मागे घेतलेला FPO असतो काय? IPO पेक्षा काय असतं वेगळं? समजून घ्या सोप्या भाषेत

तसेच केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांकडून करण्यात आलेल्या टीकेला आठवले यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. "विपक्षी दल हमेशा करता है मोदी सरकार की निंदा, ये तो है उनका हमेशा का धंधा, मोदी जी है बहुत मज़बूत बंदा, और विपक्षीदल दिखाई देता है अंधा।" अशी कविता आठवले यांनी ऐकवली.

ramdas athawale kavita Video slams opposition over Union Budget 2023 watch viral video
MLC Election Result : भाजप की मविआ? 'या' जागेवरून ठरणार वरचढ कोण; आज शिक्षक-पदवीधरचा निकाल

अजित पवार काय म्हणालेत...

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावर केवळ चुनावी जुमला असल्याचे म्हटले आहे. प्राप्ती कराची मर्यादा सात लाखांपर्यंत वाढवली असली तरी ती पुरेशी नाही. ही प्राप्ती कराची मर्यादा वाढवताना फसवेगिरी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

तसेच अजित पवार यांनी सरकारवर टीक करत म्हटले की, महागाई कमी करण्यासाठी आणि रोजगारवाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस उपाययोजना नाही. जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करायला केंद्र सरकार सोयीस्कर विसरलं.

गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांना काहीही ठोस देण्यात आलेलं नाही. देशातील शेती आणि शेतकरी संकटात आहे. सातत्यानं नैसर्गिक आपत्ती येत आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करुन केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव देण्याविषयी अर्थसंकल्पात चकार शब्द काढलेला नाही, असे म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com