रामदास आठवले म्हणतात, 'महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप'

वृत्तसंस्था
बुधवार, 11 मार्च 2020

मध्य प्रदेशमध्ये जसे राजकीय बदल झाले आहेत. असेच बदल छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही होतील. महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार येऊ शकते.

मुंबई : मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातही राजकीय भूकंप होईल, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असेही ते म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात महायुतीचे सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. पण हे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपसह इतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्ये केली जात आहेत. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत नाराज असून, लवकरच ते परत येतील. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेतेमंडळींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास दिला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरे परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार भाजपमध्ये येतील.

महाराष्ट्रातही बदल दिसेल

मध्य प्रदेशमध्ये जसे राजकीय बदल झाले आहेत. असेच बदल छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही होतील. महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येऊ शकते, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale talked about Maharashtra Government