
Sharad Pawar: उद्धव ठाकरेंनी दोन दिवस बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ केला, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केला होता. यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. रामदास कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या दाव्याला शरद पवारांचा हवाला दिला आहे.