रामदास कदमांना अडचणीत आणणाऱ्या 'ऑडिओ क्लिप'मध्ये नेमकं काय होतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

रामदास कदमांना अडचणीत आणणाऱ्या 'ऑडिओ क्लिप'मध्ये नेमकं काय होतं?

शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणुन ओळख असणारे रामदास कदम यांनी आज आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. शिवसेनेच्या (Shiv Sena) बड्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या रामदास कदमांना (Ramdas Kadam) काही दिवसांपासून पक्षात दुय्यम स्थान दिलं जात असून, त्यामुळेच ते नाराज असल्याचं दिसतंय. रामदास कदम यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी एका ऑडिओ क्लिप (Ramdas Kadam Audio Clip) प्रकरणाचा उल्लेख केला. या सगळ्या गोष्टींचं मुळं म्हणजे रामदास कदमांचं हेच ऑडिओ क्लिप प्रकरण. त्यामुळे हे प्रकरणा नेमकं काय हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे.

हेही वाचा: परब गद्दारी करतायेत...रामदास कदमांनी ठाकरेंना दिलेलं पत्र फोडलं!

भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. अशातच त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दापोलीतील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर असलेला त्यांचा रिसॉर्ट बेकायदेशीररित्या बांधला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याच प्रकरणाचे पुरावे शिवसेनेचेच नेते रामदास कदम यांनी दिल्याची शंका निर्माण करणारी एक ऑडिओ क्लिप समोर आली होती.

काय होती ऑडिओ क्लिप?

व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमुळे रामदास कदम यांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाली. कारण या क्लिपमध्ये प्रसाद कर्वे नावाच्या एका व्यक्तीशी एकदा रामदास कदम तर एकदा किरीट सोमय्या हे बोलता आहेत. हा व्यक्ती माहिती अधिकार कार्यकर्ता असून, तो सोमय्या यांच्याकडून कारवाईची माहिती घेतोय, तर तीच माहिती तो नंतर रामदास कदम यांना देतोय. एवढंच नाही तर रामदास कदम यांना जेव्हा कारवाईची माहिती मिळते, तेव्हा ते आनंद देखील व्यक्त करता आहेत.

हेही वाचा: "अमरावती सारखा प्रयत्न राज्यात पुन्हा झाला तर..."; राज ठाकरे आक्रमक

रामदास कदमांना अनिल परबांचं राजकारण संपवायचंय का?

परिवहन मंत्री अनिल परब यांचं राजकारण संपवण्यासाठी हा सगळा प्रयत्न रामदास कदम यांनी केला असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तूळात आहे. याच हेतूनं त्यांनी अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे किरीट सोमय्यांना दिल्याचं बोललं जातंय.

रामदास कदम यांचं हे ऑडिओ क्लिप प्रकरण समोर आल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसत होतं. त्यामुळेच रामदास कदम यांना विधान परिषदेला सुद्धा संधी दिली मिळाली नाही. त्यातच आता दापोली नगरपंचायत निवडणुकीत देखील रामदास कदम यांच्या समर्थकांचा पत्ता कट करण्यात आला. त्यानंतर आता रामदास कदम यांनी ही भूमिका घेतली आहे. मात्र आपण शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच येणाऱ्या काळात लवकरच आपण पुढचा निर्णय घेऊ असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.

Web Title: Ramdas Kadam Audio Clip Kirit Somaiya Case Anil Parab Shiv Sena Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..