Ramdas Kadam | परब गद्दारी करतायेत...रामदास कदमांनी ठाकरेंना दिलेलं पत्र फोडलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

परब गद्दारी करतायेत...रामदास कदमांनी ठाकरेंना दिलेलं पत्र फोडलं!

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मागील अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. फडणवीस सरकार असताना कदम यांच्याकडे मंत्रीपद होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र, त्यांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आलं.

यातच किमान विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची अपेक्षा होती. मात्र ती संधीही डावलण्यात आल्याने रामदास कदम नाराज असल्याचं बोललं जातंय. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची खदखद व्यक्त केली. अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदमांनी (Ramdas Kadam) शड्डू ठोकल्याचं दिसतंय. त्यांनी पत्रकार परिषदेत सतत अनिल परब (Anil Parab) यांच्यावर आरोप केले. परब यांचा शिवसेना राष्ट्रवादीत घालण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची पक्षांतर्गत होणारी कुचंबणा समोर आणली. अनिल परब यांच्यामुळे कदम यांच्या मुलांनाही नगरपंचायतीसाठी तिकीट डावण्यात आलं. परब हेच खरे सेनेतील गद्दार आहेत. आणि ते सेनेच्या मुळावर उठल्याचा आरोप कदम यांनी केला. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री(Guardian Minsiter of Ratnagiri) असले तरी ते जिल्ह्यात कधीही फिरकत नाहीत. फक्त झेंडावंदनाला हजेरी लावतात. त्यामुळे जिल्ह्यात काय चाललंय, याची त्यांनी जाणीव नाही. रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचं कदम म्हणाले. (Ratnagiri shivsena)

अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मला आणि माझ्या मुलांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरू केलं आहे. माझ्या मुलांना तिकीट देतानाही त्यांनी आडकाठी केली. मी मरेपर्यंत शिवसैनिक राहिन. मला पक्षातून काढलं तरी मी सेनेची साथ सोडणार नाही. मात्र, मुलांसमोर राजकीय पर्याय आहेत. त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे.

यामुळे मुलांना भविष्यात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. इतके दिवस मी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नको, म्हणून मी शांत बसलो होतो. पण सहन करण्यालाही मर्यादा असतात. अनिल परब यांच्या हॉटेलबद्दल बोलणं, म्हणजे सेनेविरोधात बोलणं असं नाही, अस म्हणत कदम यांनी त्यांच्या कुचंबणेला वाट मोकळी करून दिली.

कदम यांचे महत्वाचे मुद्दे

  • शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशात टाकणारा अनिल परब निष्ठावान कसा?

  • परब पक्षाशी गद्दारी करतोय...आणि आमच्या मुळावर उठला

  • अनिल परब झेंडावंदन सोडून एकदाही या जिल्ह्यात आले नाहीत, त्यांना तालुका अध्यक्षांचीही माहिती नाही

  • मिलींद नार्वेकरांचा बंगला परब यांनी तोडला

  • राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले आणि अनिल परब यांनी माझ्या मुलाविरोधात कट रचला

  • शिवसेनेच्या नेत्याला कायमचं उद्ध्वस्त करण्याचं हे षडयंत्र

  • माझ्या विरोधा दिलेल्या घोषणांचा मी विरोध करतो.. परब पक्षाशी गद्दारी करतोय...आणि आमच्या मुळावर उठला

  • राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना दे मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले

ऑडियो क्लिप प्रकरणानंतर कदमांना डावललं?

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या (Dapoli Nagerpanchayt Election) पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)आणि सूर्यकांत दळवी (Surykant Dalvi) यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला असून त्यांच्यातील राजकीय अहममिकेमुळे दापोली शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam)यांच्याबाबतच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर दापोलीच्या राजकीय परिस्थितीने 'यू टर्न' घेतला असून पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सेनेची हंगामी तालुका कार्यकारिणी जाहीर करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Web Title: Ramdas Kadam Holds Press Conference And Alleged Anil Parab In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ramdas Kadam