...अन् रामदास कदमांची 'ती' खुर्ची रिकामीच राहिली|Ramdas Kadam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

...अन् रामदास कदमांची 'ती' खुर्ची रिकामीच राहिली

मुंबई : विधान परिषदेतील सहा आमदार निवृत्त झाले. त्यांना निरोप देताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर एक फोटोसेशन करण्यात आलं. पण, या फोटोसेशनला दोन भाईंनी उपस्थिती दर्शवली नाही. शेवटी खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या. अनिल परबांसोबत फोटो निघू नये यासाठी रामदास कदम (Shivsena Ramdas Kadam) गैरहजर राहिले का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा: 'माझ्यानंतर उद्धवला साथ द्या', निरोपाच्या भाषणात रामदास कदम भावूक

रामदास कदमांची खुर्ची रिकामी का? -

विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांचे फोटो काढताना शिवसेना नेते रामदास कदम आणि काँग्रेस नेते भाई जगताप दोघेही अनुपस्थित होते. गेल्या काही दिवसांपूर्वी रामदास कदम आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला होता. कदम यांनी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळेच अनिल परब यांच्याबरोबर फोटो काढण्याची इच्छा नसावी म्हणून रामदास कदम गैरहजर असल्याच्या चर्चा आहेत. पण, भाई जगताप यांनी फोटोसेशनला दांडी मारून नेमकी कोणासोबत नाराजी दर्शवली? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

कोणते आमदार निवृत्त? -

विधान परिषदेतील सहा आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. रामदास कदम, भाई जगताप, वरुण काका जगताप, गिरीष व्यास, सतेज पाटील, अमरिष पटेल, गोपिकीशन बजोरीया, प्रशांत परिचारक या आमदारांची निवृत्ती झाली आहे. अमरिष पटेल, सतेज पाटील पुन्हा निवडणूक आल्यामुळे त्यांचं पुनरागमन होत आहे. विधान परिषदेत सोमवारी त्यांचा निरोप संभारंभ पार पडला. त्यानंतर आमदारांना निरोप देताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन करण्यात आलं. पण, दोन्ही नेते गैरहजर होते.

रामदास कदम निरोपाच्यावेळी भावूक -

रामदास कदम यांनी विधानपरिषदेत निरोपाचं भाषण केलं. यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या माझ्यानंतर उद्धवला साथ द्या या वाक्याची आठवण करून दिली. बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख होईल असं काहीही मी करणार नाही. पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना अशी घोषणा करत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्याच घोषणेनंतर मी १९७० मध्ये शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. मी भाग्यवान आहे ४०-४५ वर्षे शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, असं ते म्हणाले होते. यावेळी रामदास कदम भावूक झालेले देखील पाहायला मिळाले.

Web Title: Ramdas Kadam Not Present At Photo Session During Mla Farewell In Maharashtra Assembly Winter Session 2021

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ramdas Kadam