esakal | शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री, पण सलग पाच वर्षे नाही; फडणवीसांचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadnavis-Sharad Pawar

पवार चारवेळा मुख्यमंत्री, पण सलग पाच वर्षे नाही; फडणवीसांचा पलटवार

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : ''मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं अभिनंदन! मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण हे माझ्या लक्षात नाही. ही माझी कमतरता आहे'', असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (NCP President Sharad Pawar) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर (Opposition Leader Devendra Fadnavis) टीका केली होती. त्यानंतर आता फडणवीसांनी पवारांवर पलटवार केला आहे. ''शरद पवार आणि माझ्या मुख्यमंत्री पदामध्ये फरक आहे'' असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: मावळ गोळीबारावरून पवारांचे फडणवीसांना उत्तर!

हेही वाचा: 'केंद्राची ऑफर नाकारण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत'

''मी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होतो. पवारसाहेब मोठे नेते आहेत. पवार हे चारवेळा मुख्यमंत्री होते. पण ते सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाही. कधी-कधी दोन वर्षे, तर कधी तीन वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहता आलं. विरोधी पक्षनेता म्हणून मी समाधानी आहे, हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ आहे'', असा जोरदार पलटवार फडणवीसांनी केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत भाजप नेत्या मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत दर्शवली होती. यावेळी त्यांनी 'मला वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. मला मुख्यमंत्री नाही, असं कधीच जाणवत नाही. तुमच्यासारख्या नेत्यांमुळे मला ही जाणीव होत नाही. माणूस कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाहीतर, तो काम काय करतो हे महत्वाचं आहे' असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका झाली. याचवरून शरद पवारांनी देखील फडणवीसांवर टिप्पणी केली होता. ''मी अजूनही मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांचं अभिनंदन! मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण हे माझ्या लक्षात नाही. ही माझी कमतरता आहे'' असे पवार म्हणाले होते.

loading image
go to top