
“Dismissed Beed Police Sub-Inspector Ranjeet Kasale being taken into custody by Gujarat Police during a midnight operation in Latur.”
esakal
Summary
बीडचे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली.
गुजरातमधील जबरी घरफोडीतील आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली.
गुजरात पोलिसांनी दोन दिवसांपासून कासलेच्या शोध मोहिमेला सुरुवात केली होती.
बीड पोलिस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला मध्यरात्री गुजरात पोलीसांनी लातूरमधून अटक केली आहे. गुजरातमधील जबरी घर फोडीतील आरोपींना मदत केल्याचा संशय असल्यावरुन कासलेला अटक करण्यात आल्याचे समजते. गुजरात पोलिसांनी दोन दिवसांपासून रणजीत कासलेच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरु केली होती. अखेर लातूर पोलीस आणि गुजरात पोलीसांच्या एकत्रित मोहीमेदरम्यान आज मध्यरात्री कासलेला ताब्यात घेण्यात आले.