Savarkar Controversy : शरद पवारांचा उल्लेख करत सावरकरांच्या नातवाचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले…

ranjeet savarkar criticize uddhav thackeray over congress rahul gandhi vir Savarkar Controversy Maharashtra politics
ranjeet savarkar criticize uddhav thackeray over congress rahul gandhi vir Savarkar Controversy Maharashtra politics

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणी महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजप यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपकेले जात आहेत. दरम्यान या प्रकरणात आता स्वतंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

रणजीत सावरकर म्हणाले की, राष्ट्रभक्ताच्या नावाचा असा वापर होणे गंभीर आहे. काही हिंदुत्वावादी पक्ष त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी सावरकरांचा वापर करतात. बाळासाहेबांना सावरकरांचा खूप आदर होता, मनिशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलन देखील केलं. बाळासाहेबांचं नाव सांगत सावरकर केवळ आमचेच आहेत त्यांनी असा जो स्टँड घेतला आहे तो दुर्देवी आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले, सावरकर स्मारकात जयंतराव टिळक हे काँग्रेसचे नेते तत्कालिन विधानपरिषदेचे सभापती हे स्मारकाचे अध्यक्ष होते. सावरकरांचा आदर बाळगणारे लोकं काँग्रेसमध्ये आहेत पण ते आवाज उठवत नसतील तर त्याला अर्थ नाहीये, असे सावरकर म्हणालेत.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ranjeet savarkar criticize uddhav thackeray over congress rahul gandhi vir Savarkar Controversy Maharashtra politics
Toll Price Hike : मुंबई-पुणे प्रवास महागणार! एक्स्प्रेसवेवरील टोल वाढला, जाणून घ्या नवे दर

उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना रणजीत सावरकरांनी ठाकरेंवर टीका देखील केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असली तरी ते स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेलं शिदोरी या मासिकात अत्यंत अक्षेपार्ह, अश्लिल भाषेत सावरकरांवर टीका करणारे लेख लिहीले गेले. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मला भेट तर दिली नाहीच, माझ्या पत्राला देखील उत्तर दिलं नाही असे रणजीत सावरकर म्हणाले.

मुख्यमंत्री असताना ते बदनामीची कारवाई करु शकले असते. त्यांनी शरद पवारांची बदनामी अभिनेत्रीने केली तेव्हा तिला एक महिना जेलमध्ये पाठवलं. शरद पवार यांच्यासाठी जो न्याय लागू झाला तो सावरकरांबद्दल झाला नाही. शरद पवार यांच्याबद्दल फार अक्षेपार्ह बोललं गेलं नव्हतं पण सावरकरांवर अश्लिल भाषेत टीका होऊन देखील ती त्यांनी मान्य केली कारण काँग्रेस त्यांचा पार्टनर होता असे रणजीत सावरकर म्हणाले.

ranjeet savarkar criticize uddhav thackeray over congress rahul gandhi vir Savarkar Controversy Maharashtra politics
Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस धमकी प्रकरणी मोठी बातमी! अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

तुमच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असेल ते व्यक्तिगत मान्य, पण जोपर्यंत ते कृतीत उतरत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही, आज जे कोणी सावरकरांचा अपमान होताना लढायला पुढे येतात ते खरे सावरकरवादी आहेत असं माझं स्पष्ट मत आहे असेही यावेळी रणजीत सावरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com