राज्याच्या उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांच्या विचार गटात सोलापूरचे रणजिसिंह डिसले अन्‌ कादर शेख

disale-guruji_202102559621.jpg
disale-guruji_202102559621.jpg

सोलापूर : राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करताना मार्गदर्शन तथा मदत व्हावी, यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध नामवंत, उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करण्यात आला आहे. त्याची आता कार्यवाही सुरु होणार आहे. त्यात सोलापूर महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख आणि ग्लोबल टिचर रणजितसिंग डिसले यांचा समावेश करण्यात आला आहे.

विचार गटातील अधिकारी व शिक्षक 
विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्‍त (विचार गटाचे अध्यक्ष), दिनकर टेमकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (उपाध्यक्ष), विकास गरड, प्र-प्राचार्य, आयटी (सहसचिव), उल्हास नरड, चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, कादर शेख, सोलापूर महापालिका प्रशासनाधिकारी, एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सिंधुदूर्ग, डॉ. वैशाली वीर, नाशिकचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, कमलाकांत म्हेत्रे, पंचायत समिती, पुणे, गटशिक्षणाधिकारी, कलीमोद्दिन शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद, योगेश सोनवणे, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा व प्रशिक्षण संस्था, नाशिक, रणजितसिंह डिसले, झेडपी शाळा, कदमवस्ती, परितेवाडी, बालाजी जाधव, झेडपी शाळा, विजयनगर, सातारा, संदीप गुंड, झेडपी शाळा, पालघर, सुनिल आलुरकर, झेडपी शाळा, मुंगशी, नांदेड, आनंदा आनेमवाड, झेडपी शाळा, मल्याण मराठी डहाणू, पालघर, मृणाल गांजळे, झेडपी शाळा, पिंपळगाव, म्हाळुंगे, पुणे, शहाजी भापकर, झेडपी शाळा, सरदवाडी, जामखेड, दत्तात्रय वारे, झेडपी शाळा वाबळेवाडी, शिरूर, अर्जून कोळी, कराड नगरपरिषद शाळा क्र.तीन, कराड, दिपाली सावंत, झेडपी शाळा, कोल्ही, वर्धा, भाऊसाहेब चासकर, झेडपी शाळा, वीरगाव, ता. अकोले, राजेंद्र परतेकी, झेडपी उच्च प्राथमिक शाळा, पालडोह, चंद्रपूर, अंकुश गावंडे, झेडपी शाळा, मंगरूळ चवाळा, अमरावती, भगवंत पाटील, पै. शंकर तोडकर हायस्कूल, वाकरे, कोल्हापूर, दत्तात्रय गुंजकर, झेडपी शाळा, पुयना, हिंगोली, नितीन पांचाळ, झेडपी शाळा, पाचाल बौध्दवाडी, राजापूर, रत्नागिरी, बापू बाविस्कर, झेडपी शाळा दत्तावाडी, औरंगाबाद, गजानन जाधव, रा. जि.प.शाळा, चिंचवली, रायगड, अमरसिंग मगर, बृहन्मुंबई मनपा माध्यमिक शाळा, बर्वे नगर, मुंबई आणि ज्योती बेलवले झेडपी शाळा, दोऱ्याचा पाडा, ठाणे यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांसह शाळांचा सर्वांगिण विकास करुन जागतिक स्तरावर गुणवत्तेत विद्यार्थी उंचवावेत म्हणून राज्य सरकारने नव्याने विचार गट स्थापन केला आहे. त्याचे अध्यक्ष शिक्षण आयुक्‍त असून उपाध्यक्ष म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणचे संचालक आहेत. या विचार गटात एकूण 30 जणांची समिती आहे. ही समिती आता प्रत्येक जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com