
बीड जिल्ह्यातील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. शिक्षक मोहन आघाव यांनी कासलेंविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, कासले यांनी सोशल मीडियावरून लोकप्रतिनिधींबाबत अश्लील वक्तव्ये केली आहेत. तसंच दोन गटांना थेट भिडण्याचं आवाहनही केलंय. यामुळे जातीय तणावामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याची भीती मोहन आघाव यांनी व्यक्त केलीय.