Raosaheb Danve: लव्ह मॅरेज करताना ज्या काही खाणाखुणा सुरू...गुलाबराव पाटलांवर दानवेंची टोलेबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raosaheb Danve News

Raosaheb Danve: लव्ह मॅरेज करताना ज्या काही खाणाखुणा सुरू...गुलाबराव पाटलांवर दानवेंची टोलेबाजी

राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे लव्हमॅरेज आणि अरेंज मॅरेजची चर्चा रंगली आहे. यावरुन राजकीय नेत्यांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली.(Raosaheb Danve reply to Gulabrao Patil's criticism Shivsena Maha Vikas Aghadi maharashtra politics )

सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी दानवेंनी तुफान फटकेबाजी केली. गुलाबराव आपलं लव्ह नव्हे अरेंज मॅरेज, असं दानवे म्हणाले.

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले अडीच वर्षांपूर्वी आमची भाजपसोबतची युती तुटली. लव्ह मॅरेज तुटलं, पण योगायोगाने पुन्हा जुळून आलं. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याला रावसाहेब दानवे यांनी देखील तेवढ्याच मिश्किलपणे उत्तर दिलं.

गुलाबराव आपलं लव्ह मॅरेज नव्हत तर अरेंज मॅरेज होतं. लव्ह मॅरेज तुम्ही त्यांच्यासोबत केलं होतं. लव्ह मॅरेज करताना तुमच्या ज्या काही खाणाखुणा सुरू होत्या, त्या मला कळाल्या होत्या असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगवाला.

दरम्यान यावेळी गुलाबराव पाटील यांनी शाळेचे दप्तर हाती होते तेव्हापासून मी शिवसेनेसोबत आहे. पस्तिस वर्षे एक झेंडा, एक विचार आणि एक शिवसेना आमची होती. आम्ही ठाकरेंना समजावून सांगितले की, एकनाथ शिंदेंना गमावू नका. आपले ज्याच्यांशी लफडे होते त्यांना समजवा आणि पुन्हा एकत्र या. आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही 50 कोटी घेतले. पश्चिम बंगालला एक रेड पडली. 27 कोटी आणायला टेम्पो लागली. 50 कोटी कोणत्या गाडीत आणले. ते तर दाखवा, असा सवाल उपस्थित केला.