
"मला महाराष्ट्राचा 'ब्राह्मण' मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा आहे": दानवे
औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल औरंगाबाद येथे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण बघण्याची इच्छा आहे असं म्हटलं आहे. मंगळवार सायंकाळी जालना येथे परशुराम जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते.
(Raosaheb danve News)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले होते की, कोणत्याही जातीतला किंवा तृतीयपंथीयांनासुद्धा १४५ सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर ते सत्ता स्थापन करु शकतात किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. दानवे यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना ते बोलत होते. परशुराम जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये दानवे यांनी हे वक्तव्य केलं होतं. ब्राह्मण समाजाच्या एका व्यक्तीने दानवे यांच्या भाषणाच्या वेळी प्रशासकीय आणि सरकारी सेवेमध्ये ब्राह्मणाचा सामावेश जास्त असावा अशी मागणी केली होती.
हेही वाचा: UPSC Calendar 2023: 28 मे रोजी पूर्व अन् 19 फेब्रुवारीला होणार IES परिक्षा
रॅलीमध्ये एका व्यक्तीने केलेल्या मागणीवर उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले की, "मी ब्राह्मण समाजाला फक्त नगरसेवक किंवा सरकारी नोकरीमध्ये नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो." पुढे बोलताना ते म्हणाले की, मी उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी गेलो असताना जातीयवाद खूप वाढल्याचं मला दिसलं. समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एका नेत्याची गरज आहे असं ते म्हणाले.
हेही वाचा: लोकसभा अध्यक्षांच्या बोगस Whatsappवरुन खासदारांना मेसेज; तिघांना बेड्या
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की, माणूस कुणीही असो, कोणत्याही जातीधर्माचा असो किंवा तृतीयपंथी असो त्याला फक्त १४५ आमदारांचा पाठिंबा असला की तो मुख्यमंत्री होउ शकतो. मुख्यमंत्री होण्यासाठी जातीची नाही तर बहुमताची गरज आहे असं अजित पवार म्हणाले.
Web Title: Raosaheb Danve Said Brahmin As Maharashtra Chief Minister
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..