भाजप नव्हे,तर शिवसेना प्रभू रामाच्या नावाने राजकारण करते : रावसाहेब दानवे

'आम्ही नेहमी हिंदुत्वासाठी लढत आहोत.'
Uddhav Thackeray And Raosaheb Danve
Uddhav Thackeray And Raosaheb Danveesakal

जालना : केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सोमवारी (ता.११) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, भाजप नव्हे, तर शिवसेना प्रभू रामाच्या नावाने राजकारण करत आहे. भाजपच्या एके काळच्या मित्र पक्षाने हिंदुत्वाचे (Hindutva) पेंटट हा काँग्रेस (Congress Party) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) सत्तेसाठी विकला आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. दानवे हे एएनआय वृत्तसंस्थेशी फोनवर बोलत होते. भाजप नव्हे, तर शिवसेना (Shiv Sena) रामाच्या नावावर राजकारण खेळत आहे. आम्ही नेहमी हिंदुत्वासाठी लढत आहोत. शिवसेननेने त्याचा पेंटट विकला आहे. सेना वेळोवेळी स्वतःचा रंग बदलत आली आहे. (Raosaheb Danve Said Shiv Sena Is Playing Politics In The Name Of Lord Ram)

Uddhav Thackeray And Raosaheb Danve
Aurangabad| अश्लील व्हिडिओ प्रकरणी 'किर्तनकार बाबा'सह महिलेवर गुन्हा दाखल

जेव्हा देशात आणीबाणी होती, तेव्हा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. जेव्हा प्रणब मुखर्जी यांचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन झाले, तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली. भाजपने केवळ स्वतःचा लोगो काही काळापुरता बदलला. हिंदुत्वावरची भूमिका बदललेली नाही. आम्ही केवळ निवडणुकीचे चिन्ह बदलले आहे, त्यांनी तर त्यांची बाजूच बदलली, अशी टीका रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) शिवसेनेवर केली. आम्ही हिंदुत्वाचा त्याग केलेला नाही. ज्यावेळी जनसंघ होता, त्यावेळी नाही आणि आता भाजप असतानाही नाही. हो काही काळापुरते आम्ही चिन्ह बदलले, असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray And Raosaheb Danve
ऊस जळाला...आर्थिक नुकसान सहन न झाल्याने महिलेचा हृदयविकारामुळे मृत्यू

रविवारी (ता.दहा) ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला उद्देशून म्हणाले होते, की जर प्रभू राम जन्माला आले नसते तर भाजपने कोणता मुद्दा उपस्थित केला असता. आज रामनवमी आहे. मला आश्चर्य वाटते, की जर प्रभू राम जन्माला आले नसते, तर कोणता मुद्दा भाजपने राजकारणात आणला असता. त्यांच्याकडे मुद्देच नसतात. म्हणून ते सांप्रदायिक मुद्द्यांना राजकारणात आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) केला. यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, की हा मुद्दा फक्त भाजप पुरता सीमित नाही, तो प्रत्येकासाठी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले, त्यावर ते दावा करु शकत नाहीत, असा घणाघाती टीका दानवे यांनी ठाकरे यांच्यावर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com