रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ; फोन टॅपिंग प्रकरणी साक्षीदारांनी दिली धक्कादायक माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi shukla

पुन्हा एकदा फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत

रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ; फोन टॅपिंग प्रकरणी साक्षीदारांनी दिली धक्कादायक माहिती

फोन टॅपिंगप्रकरणी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आज मुंबई पोलिसांनी सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत ६ जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले आहेत. या 6 जणांमध्ये त्यावेळी असणारे एसीएस होम आणि डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, याप्रकरणातील हे डीवायएसपी त्यावेळी एसआयडीमध्ये तैनात होते. त्यांना या टेपिंग प्रकरणाची माहिती होती. त्यामुळे फोन टेपिंगसाठी बनावट नावाचा वापर करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. संजय राऊत यांच्यासाठी 'एस रहाटे' आणि एकनाथ खडसेंसाठी 'खडसणे' हे नाव वापरण्यात आली आहेत. या लोकांनी संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्याशी साधर्म्य असलेली नावे वापरली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शुक्ला यांच्याविरुद्ध फोन टॅपिंगप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला होता. भारतीय टेलिग्राफ कायद्याअंतर्गत मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने हा गुन्हा नोंदवला होता. राज्य गुप्तचर विभागात (सीआयडी)मध्ये कार्यरत असताना नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर असून शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणात (phone tapping case) दाखल झालेला एफआयआर रद्द (FIR cancelation) करण्यासाठी अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका (petition in supreme court) दाखल केली होती.