Ratan Tata : टाटांनी गौरवलेला वर्दीतील दर्दी चित्रकार; चित्र पाहून टाटाही झाले होते चकित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan Tata

Ratan Tata : टाटांनी गौरवलेला वर्दीतील दर्दी चित्रकार; चित्र पाहून टाटाही झाले होते चकित

वर्दीतील दर्दी कलकार पोलिसी कर्तव्य चोख बजावत असतानाच मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग आपली कला जोपासण्यासाठी करत असतात. त्यातून साकारलेली कलाकृती त्यांना एक वेगळी ओळखही मिळवून देते.

अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मान्यवरांनीही त्यांच्या कलेचे वेळोवेळी कौतुक केलेले आहे. महामार्ग पोलिस विभागात कार्यरत रमेश चोपडे त्यापैकीच एक. शाळेपासूनच चित्रकलेची आवड असलेले चोपडे वारली पेंटिंग, कॅन्व्हान्स आणि तैलचित्रांबरोबरच अन्य चित्रेही रेखाटतात.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते मुंबईत अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी आपल्या कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात वारली चित्रे काढून घेतली होती. ती चित्रे रमेश चोपडे यांनी साकारली होती.

हेही वाचा: Gautam Adani : प्रतिस्पर्धी असलेल्या अंबानींबद्दल अदानी यांचं मोठं वक्तव्य म्हणाले, मी तर त्यांचा...

तेव्हा सदानंद दाते यांच्याकडून चोपडे यांना शाबासकीची थाप मिळाली होती. चोपडे यांनी अनेक प्रकारची अनेक चित्रे रेखाटली आहेत.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, माजी आयुक्त ए. एन. रॉय इत्यादींसारख्या अनेकांची चित्रे काढून चोपडे यांनी त्यांना भेट म्हणून दिली आहेत.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

रतन टाटांकडून कौतुक

रमेश चोपडे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगपती रतन टाटा यांचे चित्र आपल्या कुंचल्यातून साकारले. चोपडे यांनी सपत्निक टाटा यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे चित्र भेट स्वरूपात दिले.

आपले हुबेहूब चित्र पाहून टाटाही अवाक् झाले. चित्र न्याहाळत असतानाच टाटा यांनी चोपडे यांच्या पाठीवर हात ठेवत ‘जबरदस्त’ अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :policeratan tataPainitng