Gautam Adani : प्रतिस्पर्धी असलेल्या अंबानींबद्दल अदानी यांचं मोठं वक्तव्य म्हणाले, मी तर त्यांचा...

अदानी आपल्या कोळसा आणि बंदर व्यवसाया पलीकडे विस्तार करू इच्छित आहेत आणि रिलायन्स कंपनी ग्रीन एनर्जीमध्ये विस्तार करत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniSakali

अदानी आणि अंबानी दोघेही गुजरातचे आहेत आणि 1991 मध्ये भारताने अर्थव्यवस्था खुली होण्यापूर्वीपासून ते मोठे व्यावसायिक साम्राज्य चालवत आहेत. त्यांनी सर्व क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे.

अदानी आपल्या कोळसा आणि बंदर व्यवसाया पलीकडे विस्तार करू इच्छित आहेत आणि रिलायन्स कंपनी ग्रीन एनर्जीमध्ये विस्तार करत आहे.

अब्जाधीश गौतम अदानी यांनी म्हटले आहे की, ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना आदर्श मानतात आणि त्यांचा मुलगा मुकेश अंबानी यांना मित्र मानतात. 'इंडिया टीव्ही' वाहिनीच्या 'आप की अदालत' या विशेष कार्यक्रमात ते म्हणाले, "धीरूभाई हे आमच्यासाठी आदर्श आहेत."

गौतम अदानी म्हणाले, "मुकेश भाई माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो. पेट्रोकेमिकल्सच्या त्यांच्या पारंपारिक व्यवसायाव्यतिरिक्त, त्यांनी जिओ, तंत्रज्ञान आणि रिटेल क्षेत्रासह रिलायन्सला नवी दिशा दिली. त्यांनी भारताच्या प्रगतीत मदत केली. देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे."

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

गौतम अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध त्यांच्या व्यवसायाच्या भरभराटीचे कारण असल्याचे विचारले असता, ते म्हणाले की, हा पूर्णपणे निराधार आरोप आहे कारण ते अनेक विरोधी-शासित राज्यांमध्येही काम करत आहेत.

ते म्हणाले, “प्रत्येक राज्यात जिथे शक्य असेल तिथे जास्तीत जास्त गुंतवणूक करणे हे आमचे उद्दिष्ट असेल. अदानी समूह आज 22 राज्यांमध्ये काम करत आहे. या सर्व राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही.

Gautam Adani
Budget 2023 : खुशखबर! मोदी सरकारने करदात्यांसाठी बदलला 73 वर्षांपूर्वीचा 'हा' नियम

केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आहे, आम्ही बंगालमध्ये ममता दीदींसोबतही काम करत आहोत, आम्ही नवीन पटनायक जी, जगनमोहन रेड्डी, केसीआर यांच्यासोबतही काम करत आहोत. जिथे जिथे प्रादेशिक पक्षांची सरकारे आहेत तिथे आम्ही काम करत आहेत."

रजत शर्मा यांनी आयोजित केलेल्या 'आप की अदालत' या कार्यक्रमात गौतम अदानी म्हणाले, "तुम्ही मोदीजींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी धोरणाबद्दल बोलू शकता. देशहितासाठी चर्चा करू शकता, परंतु जे धोरण बनवले जाते ते सर्वांसाठी असते, ते केवळ अदानी समूहासाठी बनलेले नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com