
सोलापूर : वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवून परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. त्यात सोलापुरातील क्लास चालक संदीप शहा याच्यावर व्यवहार फायनल करण्याची प्रमुख जबाबदारी होती, अशी माहिती समोर आली आहे. तो गुण वाढविण्यासाठी पालकांकडून ९० लाख रुपये मागायचा आणि तडजोडीअंती प्रत्येकी ८७ लाख ५० हजार रुपये घ्यायचा, अशीही बाब समोर आली आहे.
सीबीआय प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार गुण वाढविण्यासाठी ही टोळी प्रत्येक परीक्षार्थीमागे तब्बल ९० लाख रुपये मागत होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी आमची ओळख असून त्यांच्यामार्फत ‘नीट’मध्ये गुण वाढवण्यात येतील. किती गुण वाढले याची माहिती निकालाच्या सहा तासांआधी पालकांना कळू शकेल, असेही ते पालकांना सांगायचे. सीबीआयने संदीप शहा आणि सलीम पटेल या दोघांना अटक केली असून आज त्यांच्या रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शहा गुण वाढवून घेण्यास इच्छुक पालकांना परळ येथील आयटीसी ग्रँड मराठा हॉटेलमध्ये बोलावत होता आणि त्याठिकाणी त्यांच्या बैठका होत होत्या, असेही सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
सोलापूरच्या शहावर पालक शोधण्याची जबाबदारी
गुण वाढवून देण्याच्या टोळीत सोलापूर येथील संदीप शहा याचा समावेश असून तो नीट परीक्षार्थींच्या पालकांची मुंबईत भेट घेऊन त्यांना जाळ्यात अडकविण्याची मुख्य जबाबदारी त्याच्यावर होती. त्याला ९ जून रोजी मुंबईत अटक करण्यात आली. तर पटेल हा नवी मुंबईत ॲडमिशन कन्सल्टन्सी चालवतो. परीक्षार्थी, त्यांच्या पालकांना तो शहाकडे वळवत असे. सीबीआयकडून त्या परीक्षार्थी, पालकांचीही चौकशी होणार आहे.
संदीप शहाच्या मोबाईलमध्ये अनेकांची माहिती
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शहा व पटेल यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली असून त्यात गुन्ह्याशी संबंधित भक्कम पुरावे हाती लागल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या तपासणीत संशयित आरोपींशी संपर्क साधलेले व गुण वाढवून घेण्यास इच्छुक असलेले पालक, परीक्षार्थींची माहिती आहे. याशिवाय परीक्षार्थींचे रोल नंबर, ओएमआर शीट, ॲडमिट कार्ड आणि हवालामार्फत घडलेल्या आर्थिक व्यवहारांबाबतची देखील महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.