Ratnagiri : 'ढेकणाला मारायला गोळीची गरज नसते'; जाहीर सभेत उद्धव ठाकरेंचा जोरदार प्रहार

शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही केली. माझ्या वडिलांनी केलीये, असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
Ratnagiri khed Uddhav Thackeray Sabha Speech
Ratnagiri khed Uddhav Thackeray Sabha Speechesakal
Summary

मला निवडणूक आयुक्तांना सांगायचं आहे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या. कोणती 'शिवसेना' ती बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत.

खेड (रत्नागिरी) : या अभूतपूर्व अशा दृश्याचं वर्णन काय करायचं? डोळ्यात मावत नाही, असं हे आई जगदंबेचं रुप आहे. लहानपणी बाळासाहेबांच्या भाषणाला जायचो. तेव्हा मला कळायचं नाही. पण, आज मला जाणीव झालीये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सभेला जमलेल्या शिवसैनिकांचं कौतुक केलं. ते रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'ज्यांना आजपर्यंत जे-जे शक्य होईल ते दिलं. तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरीसुद्धा ते खोक्यांमध्ये बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. माझे हात आज रिकामे आहेत. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. पण, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. याच्यासाठी पूर्वजांची पुण्यायी असावी लागते. आज मी तुमच्याकडं आलेलो आहे. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. तुमची साथ-सोबत मला पाहिजे.'

Ratnagiri khed Uddhav Thackeray Sabha Speech
Satara : छत्रपतींबद्दल आदर असता तर संभाजीराजेंना का तिकीट दिलं नाही? शिवेंद्रराजेंचा ठाकरेंना सवाल

जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण, तुम्ही शिवसेना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल, पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार? असंही ठाकरेंनी सुनावलं.

Ratnagiri khed Uddhav Thackeray Sabha Speech
Ratnagiri : कोकणानं निष्ठावंत शिलेदार सेनेला दिले, पण काही बांडगुळं..; ठाकरेंच्या सभेत अंधारेंचा घणाघात

मैदानाचं 'गोळीबार' छान नाव आहे, पण शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलंय, ढेकणाला मारायला गोळीची गरज नसते. बोट पुरतं. तुमचं बोटाचं मत त्याला पुरेस आहे, असंही त्यांनी मिश्किलपणे सांगितलं. मला निवडणूक आयुक्तांना सांगायचं आहे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या. कोणती 'शिवसेना' ती बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही केली. माझ्या वडिलांनी केलीये, असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com