
रत्नागिरी: रत्नागिरीतील अनेक ठिकाणी एमआयडीसी आणि मोठ्या कंपन्या आहेत. यामुळे अनेक वेळा वायुगळती तसेच आगीच्या घटना घडल्या आहेत. यातून अनेकांनी जीव गमावला आहे. अशातच आता जयगडमधील जिंदाल कंपनीत वायुगळती झाल्याची बातमी समोर आली आहे. याचा त्रास शालेय मुलांवर झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.