
Raj Thackeray: बिनधास्त तुडवा... मुंबईतून फौजफाटा पाठवतो; राज ठाकरे कुणाबद्दल बोलले?
रत्नागिरीः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, पक्ष बांधणी आणि जनतेशी संवाद साधत राज यांचा दौरा सुरु आहे. आज त्यांनी रत्नागिरीमध्ये कार्यर्त्यांना दिलेल्या सल्ल्याची चर्चा होतेय.
रत्नागिरीतल्या लांजा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना राज ठाकरे म्हणाले की, पक्षवाढीच्या आड जर दुसरे पक्ष येत असतील तर त्यांना तुडवायचं आणि पुढं जायचं. मी मुंबईतून फौजफाटा पाठवतो, वकिलांची फौज उभा करतो पण मागे हटायचं नाही, असे आदेशच राज यांनी दिले. त्यांच्या ह्या अनोख्या सल्ल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगत आहेत.
हेही वाचा: Swasthyam 2022: तुम्ही का अस्वस्थ होता, हे समजण्याचा सोपा मार्ग
यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ताकदीने पक्ष बांधण्याचं आवाहन केलं. पक्ष घट्ट बांधा, घराघरात मनसेबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे असं काम करा. आता पक्षाची पुनर्बांधणी करणार आहे. मुंबईत वेगळ्या पक्षाचं काम करायचं आणि रत्नागिरीत दुसऱ्याच पक्षाचं काम करायचं ही भानगड आता ठेवणार नसल्याचं राज यांनी सांगितलं. सध्या राज ठाकरेंचा कोकण दौरा सुरु आहे. यानंतर ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
हेही वाचाः दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'