मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दारावर चिकटवलं निवेदन

मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दारावर चिकटवलं निवेदन

अमरावती : कोरोना संक्रमणाचा (Corona updates) सामना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे (Government of Maharashtra) योग्य त्या उपाययोजना व नियोजन करावे अशा आशयाचे पत्र आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या दालनाच्या दारावर चिकटविले आहे. (Ravi rana stick letter on CM office door)

मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दारावर चिकटवलं निवेदन
ही आहेत जगातील काही अद्भुत स्थळं; बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

महाराष्ट्र शासनाकडून घोषित करण्यात आलेली मदत अद्यापही नागरिकांना मिळालेली नाही. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लावले असल्याने गोर-गरीब, सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी आमदार राणा यांनी केली आहे.

आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शासकीय पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांत कोरोनावरील उपचार मोफत करण्याची आवश्‍यकता आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असून लहान मुलांसाठी सावधानीचा पवित्रा म्हणून शासनाने हजारो बेडचे आधुनिक पद्धतीचे रुग्णालय उभारावे. ज्यामध्ये ऑक्‍सिजन, आयसीयूसारख्या अत्याधुनिक सेवा असणे गरजेचे आहे. सोबतच लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा उडाला आहे. यातून कोरोना संक्रमण वाढू शकते म्हणून ग्रामीण व शहरी भागात वॉर्डावॉर्डात पल्स पोलिओच्या नियोजनाच्या धर्तीवर कोरोना लसीकरण करावे जेणेकरून सोशल डिस्टेन्सिंग पाळल्या जाईल व नागरिकांना सुरक्षित लस उपलब्ध होईल.

अमरावती जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळाबाजार प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणात हे इंजेक्‍शनचे मोजमाप, ते कुठे वापरण्यात आले व कसे या संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकाऱ्यांचा स्कॉड नेमून त्यांच्या माध्यमातून याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. राज्य सरकारतर्फे कामगारांना घोषित करण्यात आलेले प्रत्येकी 1500 रुपयांचे अर्थसहाय त्यांच्या बॅंक खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. त्यामुळे कामगारांना याचा लाभ मिळून देण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आमदार राणा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

घरगुती वीजबिलात 50 टक्के सवलत द्यावी, शेतकऱ्यांना खरिपासाठी उपलब्ध असलेल्या बियाण्यांची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करावी. यांसह विविध मागण्यांचे पत्र आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दारावर चिकटवलं निवेदन
नागपूकरांनो सावधान! शहरात फिरतोय बिबट्या
मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या गंभीर प्रश्‍नांच्या संदर्भातील निवेदन त्यांच्या दालनाच्या दारावर चिकटविण्यात आले.
- रवी राणा, आमदार, बडनेरा.

(Ravi rana stick letter on CM office door)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com