नागपूकरांनो सावधान! शहरात फिरतोय बिबट्या

नागपूकरांनो सावधान! शहरात फिरतोय बिबट्या
Updated on

नागपूर : वाघ (Tiger), बिबट्या (Leopard) किंवा इतर हिंस्त्र वन्यप्राण्याचं नुसतं नाव घेतलं तरी अनेकांना धडकी भरते. गडचिरोली (Gadchiroli district), चंद्रपूर ( Chandrapur district) अशा काही घनदाट जंगल (Tadoba) असलेल्या जिल्ह्यांमध्ये वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष काही नवीन नाही. अनेकदा पाण्याच्या शोधात किंवा अन्नाच्या शोधात वन्यप्राणी या भागात अनेकांवर हल्ला करतात. तसंच काही वेळी शहरातही येतात. आज नागपुरात असंच काही घडल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. (Leopard seen by people in IT park Nagpur city)

नागपूकरांनो सावधान! शहरात फिरतोय बिबट्या
'कोणाचा नवरा अन् कोणाचा मुलगा दारू पितो मला माहिती आहे'

नागपुरातील आयटी पार्क परिसर ते गायत्री नगर दरम्यान अनेक नागरिकांनी आज सकाळी बिबट्या बघितल्याचा दावा केलाय. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या मनात एकच भीती निर्माण झाली आहे. बिबट्या प्रत्यक्ष बसला होता आणि नंतर निघून गेला असा दावाही अनेकांनी केला आहे. इतकंच नाही तर बिबट्यानं पंजा मारल्याचंही अनेकांनी म्हंटलंय.

आयटी पार्क परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. तसंच यावेळी वनविभागाला पाचारण करण्यात आलं. या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आणि त्याच्या नखांचे ओरखडेही दिसून आले. त्यामुळे आता वनविभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.

नागपूकरांनो सावधान! शहरात फिरतोय बिबट्या
आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय, पण बुरशीच्या आजाराच्या सुक्ष्म निदानाची सोयच नाही

पाण्याच्या शोधात शहरात प्रवेश

अनेकदा वन्यप्राणी पाण्याच्या शोधात आपलं मूळ स्थान सोडून मानवी वस्तीत प्रवेश करतात. यामुळे हा बिबट्यासुद्धा पाण्याच्या शोधातच शहरात आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

(leopard seen by people in IT park Nagpur city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com