रझा अकादमीचा भाजप, संघावर हल्लाबोल; प्रमुख सईद नुरी म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raza noori

रझा अकादमीचा भाजप, संघावर हल्लाबोल; प्रमुख सईद नुरी म्हणाले....

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी रझा अकादमी भाजपचं बाहुलं आहे, अशी टीका केली होती. त्यावर रझा अकादमीकडून आरोप फेटाळून लावला. ''जे मॉब लिंचिंग करतात, ज्यांच्यावर बंदी घालण्याची गरज आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही'' अशा शब्दात रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी (saeed noori) यांनी भाजप (bjp) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) हल्ला चढवला. त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत आज मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

....त्याच्याशी रझा अकादमीचा संबंध नाही.

राज्यातील काही भागात हिंसाचार झाला आहे. त्याच्याशी रझा अकादमीचा संबंध नाही. आम्ही शांततेत बंद करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, तरीही हिंसा घडली. या मागे कोण आहे हे माहीत नाही. केवळ राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू असून दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा: बायडेन-जिनपिंग भेट लवकरच; भारतासोबतच्या वादावरही चर्चा होणार

आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही

आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. भाजपशी तर नाहीच नाही, असं त्यांनी सांगितलं. ज्यांच्यावर बंदी घालावी त्यांच्यावर बंदी घातली जात नाही. जे मॉब लिचिंग करतात, बंदुका वाटतात त्यांच्यावर बंदी घातली जात नाही. मात्र रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे, असा टोला त्यांनी लगावला. निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे सध्याचं सरकार फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती वापर आहे. समाजात फूट पाडली जात आहे. आपली राजकीय दुकानदारी चमकवण्यसाठी हे सुरू आहे. त्यामुळे कुणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये. या गोष्टी कोण करत आहे ते सर्वांना माहीत आहे. हेच लोक दंगे घडवून आणत आहेत. मुस्लिमांना टार्गेट करत आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष कधीच अशा गोष्टी करत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: म्यानमार सीमेवर अतिरेकी हल्ला; कमांडींग ऑफिसरच्या कुटुंबीयांसह सात जणांचा मृत्यू

loading image
go to top