अमरावती हिंसाचार : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महापौरांसह तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor chetan gawande-Anil Bonde

अमरावती हिंसाचार : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महापौरांसह तिघांना अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : अमरावती बंदला हिंसक (Amravati violence) वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी (Amravati police) धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक करण्यात आली. यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह (Anil Bonde) महापौर चेतन गावंडे (Mayor Chetan Gawande) आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय (BJP Leader Tushar Bhartiya) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिले आहे.

हेही वाचा: संतापजनक! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. या बंदने हिंसक वळण घेत अनेक दुकानाची तोडफोड करण्यात आली. तसेच काही दुकानांना आग लावण्यात आली. सर्वाधिक उपद्रव राजकमल चौक, नमुना परिसरात झाला. शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटातील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले. तर खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबारानंतर छत्रपुरी खिडकी परिसरात तीन व्यापारी प्रतिष्ठानांना काही उपद्रवींनी लक्ष केले. बंद प्रतिष्ठाने फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज लुटल्या गेला, असे खोलापुरीगेट पोलिसांनी सांगितले. त्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपचे महापौर चेतन गावंडे यांना अटक केली आहे. तसेच भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि सभागृह नेते तुषार भारतीय यांना अटक केली आहे.

loading image
go to top