New India Bank : न्यू इंडिया सहकारी बँकेवर निर्बंध; रिझर्व्ह बँकेकडून कर्ज वितरण करण्यास मनाई
RBI Actions : रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले असून, कर्जवाटप व ठेवी व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
RBI imposes six-month restrictions on New India Cooperative BankSakal
मुंबई : न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. या काळात कर्ज वितरण, ठेवी घेण्यास तसेच पैसे काढण्यास मनाई करण्यात आल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.