त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात कायदा हातात घेणं अयोग्य - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात कायदा हातात घेणं अयोग्य - शरद पवार

"त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात कायदा हातात घेणं अयोग्य"

मुंबई : त्रिपुरातील आंदोलनाचे हिंसक पडसाद महाराष्ट्रात उमटल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. अशी घटना महाराष्ट्रात घडणं हे अयोग्य असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. अमरावतीत भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला होता.

शरद पवार म्हणाले, "त्रिपुरातील वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटणे यावेळी काही लोकांनी कायदा हातात घेणं हे अयोग्य होतं. यानंतर याचा विरोध करण्यासाठी काही लोकांनी रस्त्यावर उतरणंही योग्य नव्हतं. त्याचबरोबर अशा घटनांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देणं हे देखील चुकीचं आहे."

loading image
go to top