अजितदादांच्या राजीनाम्या मागचे 'हे' आहे कारण  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

अचानक राजकीय भूकंप घडवत 23 नोव्हेंबरला अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने चक्रे फिरली. महाविकास आघाडीने न्यायालयाचे दार ठोठावले.

अजितदादांच्या राजीनाम्या मागचे 'हे' आहे कारण 

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३.३० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असे बोलले जातेय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या राजीनाम्या मागचे कारण समोर येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्री अजितदादांना मानणारे १७ आमदार हॉटेल ट्रायडेन्टकडे आल्याचे सांगितले जाते. केवळ ही संख्या पुरेशी नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्षात आणून दिल्याने अखेर त्यांनी बंड मागे घेतल्याचे म्हणतात. पण त्यांच्या राजीनाम्याला कोणत्याही कार्यालयाने दुजोरा दिलेला नाही. दरम्यान कुटुंबातील सदस्यांनीही अजित पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न केल्याचे समजते.  

कुटुंबातील 'या' व्यक्तीमुळे वळले अजित पवारांचे मन अन् दिला राजीनामा

अचानक राजकीय भूकंप घडवत 23 नोव्हेंबरला अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने चक्रे फिरली. महाविकास आघाडीने न्यायालयाचे दार ठोठावले. आज सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला ३० तासांत बहुमत सिद्ध करायचे  सांगितले. त्या पाठोपाठ अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय पटलावर मोठी खळबळ सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप