फडणवीस यांनी अद्याप वर्षा बंगला सोडला नाही, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 November 2019

भाजपचे सरकार आता सत्तेवर येत नाही, असे चित्र निर्माण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयासह अन्य मंत्री कार्यालये आणि मंत्रालयासमोरील मंत्री बंगल्यांवर सामानांची बांधाबांध सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला राजीनामा आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे संयुक्‍त सरकार सत्तेवर येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट होत असताना फडणवीस यांना आता वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे. पण, त्यांनी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तिथेच आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपचे सरकार आता सत्तेवर येत नाही, असे चित्र निर्माण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयासह अन्य मंत्री कार्यालये आणि मंत्रालयासमोरील मंत्री बंगल्यांवर सामानांची बांधाबांध सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला राजीनामा आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे संयुक्‍त सरकार सत्तेवर येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त झाले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने मंत्री कार्यालयातील साहित्य आणि मंत्री दालनांचा शासनाकडे ताबा देण्याचे आदेश काढले आहेत. या अनुषंगाने अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात संगणक, झेरॉक्‍स मशिन, टेलिफोन आणि साहित्य सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आले आहेत. 

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने मंत्रालयातील सहाव्या मंजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात शुकशुकाट आहे. तर, दुसरीकडे वर्षा या निवासस्थानी त्यांचा अजून काही दिवस तरी मुक्काम आहे. शासकीय नियमानुसार मानवतेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही मंत्र्याला तीन महिन्यांचा अवधी मिळतो. त्यानुसार सध्या फडणवीस यांना वेळ मिळाला असून, नवे सरकार स्थापन होईपर्यंत तरी त्यांना नवे घर पाहावे लागणार आहे. 

'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reason why Ex CM of maharashtra Devendra Fadanvis didnt leave Varsha bunglow yet