गणेशोत्सवात मुंबईत विक्रमी रक्तदान; राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून कौतुक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

लालबागचा राजा मंडळाने आरोग्य उत्सवात२२ते ३१ऑगस्टदरम्यान पुन्हा१०,२७२रक्तपिशव्यांचे विक्रमी रक्त संकलन केले.मुंबईत या दोन्ही मंडळांनींच १३हजार८६६पिशव्यांचे रक्तसंकलन केले,असे परिषदेकडून सांगण्यात आले.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विशेषत: मुंबईतील गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आरोग्योत्सवावर भर दिला. परिणामी मुंबईत या काळात विक्रमी रक्तदान झाले असून सर्वच संस्था तसेच मंडळांच्या पुढाकारामुळे मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला नाही, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सांगण्यात आले.

लालबागचा राजा मंडळाने मार्च महिन्यात १,७५० पिशव्या रक्ताचे संकलन केले; तर सिद्धिविनायक न्यासाकडून एप्रिल ते जुलै महिन्यात १,८४४ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. लालबागचा राजा मंडळाने आरोग्य उत्सवात २२ ते ३१ ऑगस्टदरम्यान पुन्हा १०,२७२ रक्तपिशव्यांचे विक्रमी रक्त संकलन केले. मुंबईत या दोन्ही मंडळांनींच १३ हजार ८६६ पिशव्यांचे रक्तसंकलन केले, असे परिषदेकडून सांगण्यात आले. 

मुंबईतील लहानमोठ्या सार्वजनिक व सामाजिक मंडळांनी रक्तदानासाठी मोठी मदत केली. लालबागचा राजा मंडळ व सिद्धिविनायक न्यासाने, तर नियोजनबद्ध आयोजन करून रक्तसंकलन केले. या सर्व प्रयत्नांमुळे आता रक्तसाठ्याची स्थिती खूप चांगली आहे. 
- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record blood donation in Ganeshotsav in Mumbai Corona background