Uday Samant : वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती लवकरच ;उदय सामंत

राज्यातील सर्व प्रकारच्या महानगर-पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदाच्या भरतीबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
Uday Samant
Uday Samant sakal

राज्यातील सर्व प्रकारच्या महानगर-पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदाच्या भरतीबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतंर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, की सरकारची भूमिका धरसोडीची आहे. कित्येक विद्यार्थी रिक्त पदे कधी भरली जाणार आहेत, याची वाट पाहत आहेत. त्यामुळे शासन आपली ठोस भूमिका घेणार की नाही, असा सवाल केला.

त्याला उत्तर देताना सामंत यांनी ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून पुन्हा करण्यात येत आहे. राज्यातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा सर्व महानगरपालिकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा विचार आहे, लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढविण्याबाबतही सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com