esakal | प्राध्यापकांची मेगा भरती कधी होणार? उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

प्राध्यापकांची मेगा भरती कधी होणार? उदय सामंतांनी दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकार प्राध्यापक भरतीसाठी (recruitment of professors in maharashtra) सकारात्मक असून वित्त विभागानेही मंजुरी दिली आहे. सर्व प्राध्यापकांची पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (minister uday samant) यांनी दिली. सध्या सुमारे १५ हजार हजार सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. (recruitment of professors starts soon in maharashtra says minister uday samant)

हेही वाचा: क्लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा बुधवारी; ३५ मुलांचे स्क्रिनिंग

फडणवीस सरकारच्या काळात ४० टक्के प्राध्यापक भरतीला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मान्यता देण्यात आली होती. मात्र, आचारसंहितेमुळे ही भरती प्रक्रिया रखडली. त्यानंतर राज्यभरातील नेट-सेट पात्रताधारकांकडून वारंवार प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे आता शासन स्तरावरूनही प्राध्यापक भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी सांगितले की, प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कायमच सकारात्मक आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी वित्त विभागाने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. त्यानंतर प्राध्यापक भरतीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने पदांना मंजुरी दिली असून त्यांच्या सूचनेनुसार प्राध्यापक भरती लवकरच सुरू होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. यासोबतच महाविद्यालय पूर्वपदावर सुरू होण्यासंदर्भातील निर्णय हा स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आहे. आज केवळ कोरोनामुळे आपण परीक्षा आणि महाविद्यालय ऑनलाइन सुरू ठेवले आहेत. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येताच सर्वकाही पूर्वपदावर सुरू होईल असेही सामंत यांनी सांगितले.

तासिका प्राध्यापकांच्या मानधनात वाढ

तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना खासगी महाविद्यालयांच्या धर्तीवर मानधन मिळावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाने निर्णय घेतला असून तासिका प्राध्यापकांना खासगी महाविद्यालयांच्या धर्तीवर मानधन वाढविणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

loading image
go to top