esakal | मुलांवर क्लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा बुधवारी; ३५ मुलांचे स्क्रिनिंग
sakal

बोलून बातमी शोधा

क्लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा बुधवारी; ३५ मुलांचे स्क्रिनिंग

क्लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा बुधवारी; ३५ मुलांचे स्क्रिनिंग

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाचा (coronavirus) तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचा बचाव (Child protection) करण्यासाठी ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी बुधवारी (Human testing on children Wednesday) नागपुरात सुरू होणार आहे. १२ ते १८ वयोगटांतील जवळपास ७५ मुलांवर ही चाचणी होणार आहे. यातील ४१ मुलांना कोव्हक्सिनचा डोस (41 children were given a dose of covacin) दिला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आता ६ ते १२ वयोगटातील ३५ मुलांची स्क्रिनिंग (Screening of 35 children) करण्यात आली आहे. या मुलांना उद्या लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. (The second phase of the clinical trial on children on Wednesday)

कोरोना विरोधातील लढ्यात लहान मुलांच्या बचावासाठी लसीकरण हा पर्याय आहे. यामुळे भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर क्लिनिकल ह्यूमन ट्रायल ६ जून रोजी नागपुरातून सुरू झाली आहे. १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना रविवारी डोस दिला आहे. मेडिट्रिना रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. या मुलांना २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. मात्र, पुढच्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील मुलांवरही ह्यूमन ट्रायल सुरू झाली असून ३५ मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. बुधवारी बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणात त्यांना लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा: नात्याला काळिमा! बापाचे मुलीशी चाळे तर बहिणीचे काढले अश्लील फोटो

लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रॉयल झाली आहे. त्यांना २८ दिवस पूर्ण व्हायचे आहेत. यामुळे आताच निरीक्षण नोंदवणे शक्य नाही. दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील मुलांवर ही चाचणी करण्यात येईल. ३५ मुलांची शारीरिक चाचणी करण्यात आली. या स्क्रिनिंगनंतर त्या मुलांना लसीचा डोस देण्यात येणार आहे.
- डॉ. वसंत खळतकर, बालरोगतज्ज्ञ

(The second phase of the clinical trial on children on Wednesday)

loading image