esakal | कोकणात ‘रेड अलर्ट’; मुंबई, पुणे, कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात ‘रेड अलर्ट’; मुंबई, पुणे, कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा

कोकणात ‘रेड अलर्ट’; मुंबई, पुणे, कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या आठवड्यापासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी असला, तरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भात पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. पुढील चार ते पाच दिवस कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

महाराष्ट्राची किनारपट्टी ते कर्नाटकाची किनारपट्टीदरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची द्रोणीय स्थिती आहे. तसेच अरबी समुद्राच्या उत्तर भाग ते आंध्र प्रदेशचा किनारपट्टी दरम्यान पूर्व - पश्‍चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता असून, हा पट्टा उत्तर महाराष्ट्र आणि तेलंगणापर्यंत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. ही स्थिती कोकणातील जोरदार पावसासाठी पोषक ठरत असल्याने अनेक भागांत पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात किंचित घट झाली आहे. रविवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत ब्रह्मपुरी येथे ३६.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा: विरोधकांची मोदी सरकारला घेरण्याची तयारी, आजपासून पावसाळी अधिवेशन

येथे होणार जोरदार पाऊस :

सोमवार ः संपूर्ण कोकण, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, वाशीम, अमरावती, नागपूर, यवतमाळ,

मंगळवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, भंडारा, नागपूर

बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम

गुरुवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया

हेही वाचा: बदला घेण्यासाठी Ex बॉयफ्रेंडची गाडी घेतली अन् 49 वेळा....

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली

वाढ :

पुणे - ३०.६ (२.५)

कोल्हापूर - २७.९ (१.१)

महाबळेश्‍वर - २१.१ (१.३)

मालेगाव - ३३.८ (३)

नाशिक - ३०.९ (२.४)

सांगली - २८.८ (-०.१)

सातारा - २८.७ (१.८)

सोलापूर - ३१.८ (०.१)

मुंबई (कुलाबा) - २९.७ (-०.५)

अलिबाग - ३०.७ (०.७)

रत्नागिरी - २८.७ (-०.३)

डहाणू - ३१.५ (१.०)

औरंगाबाद - ३२.६ (२.५)

परभणी - ३३.४ (१.८)

नांदेड - ३३.५ (०.९)

अकोला - ३५.६ (३.४),

अमरावती - ३४ (३.६)

बुलडाणा - ३२ (३.३)

ब्रह्मपुरी - ३६.३ (५.७)

चंद्रपूर - ३३.८ (२.३)

गोंदिया - ३४ (२.६)

नागपूर - ३४.६ (३.१)

वर्धा - ३४.६ (३)

loading image