Raj Bhosale Reel Star:मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात

Raj Bhosale Reel Star:मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात

आपल्या चित्रपटातून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी धडपड करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित चित्रपटात २५ वर्षीय रील स्टार तरुणाला काम करण्याची संधी मिळाली आहे.

Rural Boy Raj Bhosale in Nagraj Manjule Film Reelstar: आपल्या चित्रपटातून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी धडपड करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित चित्रपटात २५ वर्षीय रील स्टार तरुणाला काम करण्याची संधी मिळाली आहे. राज अहिंद्र भोसले, असे या तरुणाचे नाव असून तो अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मारडा येथील रहिवासी आहे. एका छोट्याशा रोलमध्ये तो झळकणार आहे.

एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती श्रीवल्ली फेम विजय खंडारे यांनी राज भोसले याला दिली आणि जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे राज भोसले याने पैशाची तडजोड करून वर्धा जिल्ह्यातील सारवाडी येथील धीरज पवार या आपल्या मित्रासह थेट कोल्हापूर गाठले.

तिथे पोहोचताच छोटासा रोल मिळणार, या आशेवर राज आणि धीरजने चार दिवस काढले, परंतु काहीच झाले नाही. त्यामुळे दोघेही निराश झाले, अखेर पाचव्या दिवशी त्यांना चित्रपटाच्या काही दृश्यांमध्ये घेण्यात आले. आपल्या मुलाला एका मोठ्या निर्मात्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली हे ऐकून वडील अहिंद्र भोसले, आई शेरूना, पत्नी सुहाना, बहीण रेणुका हिच्यासह अख्ख्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (Latest Marathi News)

नृत्याने मिळाली संधी

रोल मिळाला नाही, या निराशेमुळे राज व धीरज हे चित्रीकरण आटोपल्यावर खोलीवर झोपले. तेवढ्यात हलगीचा आवाज आला, चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणी काही तरुण हलगीच्या तालावर नाचत होते. हे पाहून राज व धीरजनेही ठेका धरला. हे सर्व नागराज मंजुळे लांबून पाहत होते. त्यानंतर मंजुळे यांनी राजच्या नाचण्याला दाद दिली व विचारपूस केली. आम्ही पारधी समाजातील असल्याचे सांगताच मंजुळे यांनी आस्थेने विचारपूस केली आणि पाचव्या दिवशी काम करण्याची संधी मिळाली.

Raj Bhosale Reel Star:मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात
Aacharya VidhyaSagar Ji Maharaj Samadhi: जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज यांनी घेतली समाधी: 3 दिवसांच्या उपवासानंतर देह केला त्याग

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात एक छोटासा रोल मिळाला हेच खूप आहे. त्यांनी आमच्या सोबत चित्रीकरणादरम्यान मनमोकळेपणाने गप्पा केल्या. त्यामुळे गरिबीची जाण असलेला आणि आभाळायेवढं मन असलेला दिग्दर्शक आम्ही अनुभवला- राज भोसले, मारडा.

Raj Bhosale Reel Star:मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात
Pakistan: पाकिस्तानमध्ये खळबळ! निकालामध्ये घोटाळा केल्याची जबाबदारी स्वीकारत आयुक्ताने दिला राजीनामा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com