SambhajiRaje_ShivendraRaje
SambhajiRaje_ShivendraRaje

"कोल्हापूर-सातारा घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत"; संभाजीराजेंचं ट्विट

शिवेंद्रसिंहराजे आणि संभाजीराजे यांची अचानक भेट
Published on

पुणे : शाहू छत्रपती आणि युवराज संभाजीराजे छत्रपती या पिता-पुत्राच्या राजकीय भूमिकांची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची अचानक भेट झाली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी "कोल्हापूर आणि सातारा घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत" असं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. (relation between Chatrapati families of Kolhapur and Satara remain the same tweet by Sambhaji Raje)

संभाजीराजे यांनी म्हटलं, आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असून सुद्धा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली व आपुलकीने चौकशी केली. आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच राहोत, हीच आई भवानी चरणी प्रार्थना!

SambhajiRaje_ShivendraRaje
काँग्रेस मविआमध्ये राहणार की जाणार? उद्या दिल्लीत फैसला

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी यावर भाष्य करताना संभाजीराजेंनी कुटुंबियांना विचारुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नव्हता त्यामुळं हा छत्रपती घराण्याचा अपमान म्हणता येणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीच संभाजीराजेंना अपक्ष लढवण्याचा डाव रचून बहुजनांच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता.

SambhajiRaje_ShivendraRaje
मुसेवाला हत्या : "मारेकऱ्यांना सोडणार नाही"; केजरीवाल, मान यांची प्रतिक्रिया

या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरात न्यू पॅलेस या छत्रपतींच्या निवासस्थानी जाऊन शाहू छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. छत्रपती घराण्याचे आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच आपल्याला इथं पाठवल्याचं त्यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com